मराठा महासंघ उपाध्यक्ष भाऊसाहेब जाधव : दिशाभूल न करण्याचे आवाहन
अथणी : कागवाड विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार श्रीमंत पाटील यांनी कोट्यावधी रुपयांची कामे केली आहेत. त्यामुळे मतदारसंघांमध्ये विकासगंगा वाहत आहे. दिशाभूल करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन कर्नाटक क्षत्रिय मराठा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी केले. ते पार्थनहळी येथे पत्रकारांशी बोलत होते.
जाधव म्हणाले, गेली 50 वर्षे झाली कागवाड विधानसभा मतदारसंघात जे रस्ते झाली नाहीत ते रस्ते डांबरीकरण, शाळा इमारत बांधकाम, घरोघरी पाण्याची सोय, समुदाय भवन, देवस्थान मंदिर बांधकामासह अनेक विकास कामे जोरात सुरू आहेत. विकास कामे होत असून सुद्धा कोणीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. त्याला आम्ही जशास तसे उत्तर देऊ.
कागवाड विधानसभा मतदारसंघात 95 टक्के रस्ते डांबरीकरण झाले आहेत. आता काही रस्त्यांचे डांबरीकरण सुरू आहे. अभ्याळ ते शिवनूर फाट्या पर्यंतच्या रस्त्यासाठी 4.30 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून कामालाही सुरुवात झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले हा मतदारसंघ आदर्श करण्याचे त्यांचे स्वप्न असल्याचेही ते म्हणाले. यावेळी निंगाप्पा खोकले, शिवानंद गोंधळी, सिद्राय तेली, बाळकृष्ण चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta