बेळगाव : मुतगा ग्रामपंचायत अध्यक्षपदी म. ए. समितीची सत्ता कायम राहिली असून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कट्टर समर्थक किरण पाटील हे ग्रामपंचायत अध्यक्षपदीच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.
मावळते अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी अडीच पैकी सव्वा वर्षाची अध्यक्षपदाची टर्म झाल्यानंतर राजीनामा दिला होता त्यानंतर ही निवडणूक झाली. आणखी सव्वा वर्षासाठी किरण पाटील हे मुतगा ग्रामपंचायतचे अध्यक्ष बनले आहेत.
विजय झालेल्या किरण पाटील यांच्या बाजूने 11 तर पराभूत झालेल्या सुनील चौगुले यांना 8 मते पडली. ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदासाठी अडीच वर्षाची मुदत असते मात्र सुरुवातीलाच किरण पाटील आणि भालचंद्र पाटील यांच्यामध्ये सव्वा सव्वा वर्षे अध्यक्ष पदासाठी वाटून घेण्यात आली होती त्यामुळे भालचंद्र यांनी सव्वा वर्ष झाल्यानंतर राजीनामा दिला होता.
मुतगा पंचायतीवर समितीची एकहाती सत्ता असल्याने वास्तविक पाहता सदर निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे होते. मात्र राष्ट्रीय पक्षाकडून महाराष्ट्र एकीकरण समितीला पराभूत करण्यासाठी ताकत लावण्यात आली होती अखेर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे.
विजयी झालेले ग्रामपंचायत अध्यक्ष किरण पाटील यांचा माजी तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर यांनी अभिनंदन केलं आहे शुक्रवारी दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
किरण पाटील निवडून येताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून मुतगा ग्रामपंचायत परिसर दणाणून सोडला. यावेळी ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta