बेळगाव : पश्चिम घाटात आणि बेळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे बेळगाव तालुक्यातील मार्कंडेय नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे शेतकर्यांची पिके मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहेत.
मार्कंडेय नदीत पाण्याची आवक वाढल्याने बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी, अलतगा, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बुद्रुक या गावातील शेतकर्यांच्या शेतजमिनीत पाणी शिरले असून मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. मार्कंडेय नदीच्या आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. ऊस, भात, मका, भाजीपाला या पिकांसह इतर पिकांचे पूर्ण नुकसान झाले आहे.
राकसकोप येथून मार्कंडेय नदीत मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत. दरवर्षी असेच नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कंग्राळी खुर्द गावाजवळील मार्कंडेय पुलाखाली नदी दुथडी भरून वाहत असल्याचे दृश्य पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.