Saturday , July 27 2024
Breaking News

भाजप वगळून सर्वपक्षांच्या प्रतिनिधींसह महाराष्ट्र एकीकरण समिती सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

Spread the love

माजी महापौर सरिता पाटील
बेळगाव : बेळगाव महापालिका निवडणुकीत प्रचंड गैरकारभार झाला आहे. या विरोधात तेथील भाजप वगळून सर्वपक्षांच्या प्रतिनिधींसह महाराष्ट्र एकीकरण समिती सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. या न्यायालयीन लढ्यात आम्हाला महाराष्ट्र सरकारने सर्व प्रकारची मदत करावी, अशी अपेक्षा बेळगाव महापालिका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माजी महापौर सरिता पाटील यांनी व्यक्त केली. आज येथील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
यावेळी सरिता पाटील म्हणाल्या, ‘ही निवडणूक कर्नाटक सरकारने अत्यंत घाईगडबडीने, पारदर्शक प्रक्रिया न राबवता, लोकांना विश्वासात न घेता पार पाडली. महापालिका वॉर्ड रचना आणि आरक्षण यासंदर्भात उच्च न्यायालयात खटला प्रलंबित असताना सरकारने निवडणुका लादल्या. कोरोना पार्श्वभूमीवर टास्कफोर्सने मनाई केली असताना निवडणुका घेण्यात आल्या. मतदानावेळी ईव्हीएम मशीन सोबत व्हीव्हीपॅट मशीन नव्हते. त्यामुळे मतदान कोणाला केले हे मतदाराला कळत नव्हते. अनेक प्रभागात मतदार यादीत चुकीची नावे होती. मतदारांची नावे वगळल्याचे दिसून आले. मृत नागरिकांची नावेही मतदार यादीत होती. सुरुवातीला मतदार यादी या कन्नड भाषेतून दिल्या गेल्या. मराठीमधील याद्या मागीतल्यावर हरकतीची मुदत संपल्यानंतर त्या एकीकरण समितीच्या उमेदवारांना दिल्या गेल्या.
त्यामुळे त्यांना हरकती देता आल्या नाहीत. बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये लोकशाहीचे पावित्र्य राखले गेले नाही. म्हणूनच तेथील भाजप वगळून उर्वरीत सर्व पक्षांचे प्रतिनिधी आणि महाराष्ट्र एकीकरण समिती सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वोतोपरी मदत केली पाहिजे. यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.’ असे त्यांनी सांगितले.
उमेदवाराचे स्वतःचे मतदानही नाही
बेळगाव महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये मोठे घोळ आहेत. एका यादीमध्ये एकवीसशे नावे बोगस आहेत. ग्रामपंचायतीमधील ग्रामस्थांची नावे महापालिका मतदार यादीत आहेत. एका प्रभागात एका उमेदवाराच्या घरचे मतदान आठ आहे. मात्र त्याला चारच मते पडली आहेत. काही ठिकाणी तर उमेदवाराला स्वत:चे मतही मिळालेले नाही असे निदर्शनास आले आहे. या सर्व प्रकाराची चौकशी केली पाहिजेण, असेही सरिता पाटील यांनी सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *