बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काल 17 सप्टेंबर रोजी राबविण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक मेगा लसीकरण अभियानात बेळगाव जिल्ह्याने संपूर्ण देशात दुसरा क्रमांक पटकावून अत्युत्तम कामगिरी बजावली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिली.
सदर मेगा लसीकरण अभियानामध्ये बृहन बेंगलोर महानगरपालिकेने 4,09,977 जणांचे लसीकरण करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. बेळगाव जिल्ह्याने 17 सप्टेंबर या एका दिवसात 2,57,604 जणांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याद्वारे दुसरे स्थान मिळविले आहे.
कालच्या देश व राज्यव्यापी कोरोना प्रतिबंधक मेगा लसीकरण अभियानांतर्गत बेळगाव जिल्ह्यात 3 लाख देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. सदर उद्दिष्ट गाठता आले नसले तरी संपूर्ण देशात सर्वाधिक लसीकरणाचा दुसरा क्रमांक हस्तगत करण्यात बेळगाव जिल्हा यशस्वी झाला आहे, असे जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी सांगितले.
संपूर्ण देशात द्वितीय स्थान मिळविणे ही अत्यंत प्रशंसनीय बाब असून याला जिल्हा प्रशासनासह आरोग्य खाते, ग्रामीण अभिवृद्धि खाते, स्थानिक स्वराज्य संस्था, महिला व बालकल्याण खात्याचे अधिकारी आणि कर्मचार्यांचे परिश्रम कारणीभूत आहेत.
सदर लसीकरण अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मी सर्व लोकप्रतिनिधी, संघ -संस्था आणि जनतेचा आभारी आहे, असेही जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ म्हणाले.
Check Also
आम. असिफ सेठ यांची विविध वसतिगृहांना भेट
Spread the love बेळगाव : बेळगाव उत्तर मतदार संघाचे आमदार असिफ (राजू) सेठ यांनी आज …