कोगनोळी : हणबरवाडी तालुका निपाणी येथील, जय किसान प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघास धान्य विक्री केंद्र मंजूर करून दिल्याबद्दल माजी खासदार व बीडीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांचा चेअरमन मारुती कोळेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. सेक्रेटरी सत्याप्पा बन्ने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना चेअरमन मारुती कोळेकर म्हणाले, हणबरवाडी येथील ग्रामस्थांचे धान्य आणण्यासाठी फार हाल होत होते. कोगनोळीहून सुमारे दोन किलोमीटर चालत महिला धान्य घेऊन येत होत्या. यामुळे ग्रामस्थ व महिलांचे मोठे हाल होत होते. जय हनुमान प्राथमिक कृषी पत्तीनला धान्य विक्री सुरू करून दिल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने आभार मानले.
यावेळी युवराज खोत, संजय डूम, तात्यासाहेब खोत, मुरलीधर कोळेकर, नामदेव खोत, आनंदा बिद्रोळे यांच्यासह हणबरवाडी दत्तवाडी येथील ग्रामस्थ युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
Check Also
पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …