Wednesday , March 4 2026
Breaking News

महिला कुस्तीपटू स्मिता पाटील यांचे एनआयएस परीक्षेत यश

Spread the love

बेळगाव : बेळगावची एकलव्य पुरस्कार व राष्ट्रीय पदकविजेत्या महिला कुस्तीपटू स्मिता भावकाणा पाटील या पटियाळा येथे घेण्यात आलेल्या एनआयएस (NIS) डिप्लोमा कोर्स उत्तीर्ण झाल्या असून त्यांना मान्यवरांच्या हस्ते एनआयएस पदवी प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.
कंग्राळी खुर्दच्या महिला मल्ल स्मिता पाटील यांनी शालेय जीवनापासून कुस्तीचा सराव करून अनेक स्पर्धांमध्ये यश संपादन केले होते. महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत चमक दाखवत युनिव्हर्सिटी ब्ल्यू किताबही पटकाविला. त्याचप्रमाणे खुल्या मॅटवरील फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये राज्य राष्ट्रीय स्तरावर भाग घेऊन सुवर्ण पदकही पटकविले. 2010 मध्ये महिलांना देण्यात आलेला पहिला एकलव्य पुरस्कार स्मिता यांना मिळाला.
कुस्तीतील यशानंतर बेळगावातील होतकरू मुलींना कुस्तीचे मार्गदर्शन करता यावे यासाठी त्यांनी पटियाला येथे एनआयएस परीक्षेत भाग घेऊन त्यात यश संपादन केले. बेळगाव परिसरातील महिलांसाठी व लहान मुलांसाठी कुस्तीचे प्रशिक्षण देण्याचे ध्येय बाळग्याच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. त्यांना चीफ कोच ओ.पी. यादव, प्रशिक्षक रणबीर डाका, महेश डुकरे, शिक्षा यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच वडील भावकाणा, आई नंदा पाटील व भाऊ कपिल पाटील (सेनादल) त्याचप्रमाणे मित्र परिवाराचे त्यांना प्रोत्साहन लाभले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *