खानापूर (प्रतिनिधी) : गणेशोत्सवनिमित्त मौजे तोपिनकट्टीत (ता. खानापूर) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व श्रीमहालक्ष्मी ग्रुपवतीने शनिवारी संस्थापक विठ्ठलराव हलगेकर यांच्याहस्ते बैलगाडी हाकुन शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमेद कोचेरी, माजी जि. प. सदस्य जोतिबा रेमाणी, बाबूराव देसाई, चांगापा निलजकर, मल्लापा मारीहाळ आदीच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
तर लैला शुगरचे एम. डी. सदानंद पाटील, किरण यळ्ळूरकर, मारूती गुरव, बसवराज सानिकोप, महांतेश पाटील, आदीच्याहस्ते विविध देवदेवतांच्या फोटोचे पुजन करण्यात आले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून भाजप नेते पंडित ओगले उपस्थित होते. यावेळी विविध मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन हणमंत करंबळकर यांनी केले. तर आभार कृष्णा कुंभार यांनी मानले.
