बेळगाव : वडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील रघु पुजारी यांची सौंदत्ती यल्लम्मा देवस्थान ट्रस्टवर सरकार नियुक्त सदस्य पदी राज्य सरकारतर्फे निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा अन्नपूर्णेश्वरी मंदिर ट्रस्ट व मित्रमंडळी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविराज हेगडे होते.
सौंदत्ती यल्लम्मा देवस्थान ट्रस्टवर सरकार नियुक्त सदस्य पदी 9 जणांची निवड करण्यात आली यामध्ये बेळगावमधून सुनील पुजारी हे एकमेव आहेत.
यावेळी श्रवण हेगडे, किरण सावंत, अमित सावंत, भरत धामणेकर, सतीश पाटील, सचिन मधाळे, सचिन घोरपडे, आनंद घोरपडे, मंजुनाथ कोठीवाले, प्रसाद मार्दोळकर, शाम तुळजाई, विरेंद्र हेगडे, प्रणय पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शिन्नोळकर यांनी तर उमेश पाटील यांनी आभार मानले.
Check Also
भारत विकास परिषदेच्या “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा अपूर्व उत्साहात संपन्न
Spread the love बेळगाव : भारत विकास परिषदेवतीने आंतरशालेय “भारत को जानो” प्रश्नमंजुषा स्पर्धा जीजीसी …