खानापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या कचरा डेपोला कणकुंबी (ता. खानापूर) ग्रामपंचायत हद्दीतील चिगुळे गावच्या ग्रामस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष खाचू गुरव व पीडीओ सुनिल अभारी यांना कचरा डेपो प्रकल्पाला विरोध करत निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे. की, चिगुळे गावची वाढती लोकसंख्या व जनावरांच्या चाऱ्याची समस्या लक्षात घेऊन तसेच याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होणार यासाठी सरकारच्या कचरा डेपो प्रकल्पाला चिगुळे गावचा कडाडून विरोध होत आहे.
यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष खाचू गुरव तसेच ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ गणपत गावडे आदी उपस्थित होते.
Check Also
शिरोली येथील बेकायदेशीर वृक्षतोडी प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा; डॉ. अंजली निंबाळकर यांचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांना निवेदन
Spread the loveखानापूर : खानापूर तालुक्यातील शिरोली येथील सर्वे नंबर 97 मध्ये खासगी जमिनीत बेकायदेशीररित्या …