Sunday , September 20 2026
Breaking News

नागुर्डा येथील जवान संतोष कोलेकर यांचा आकस्मिक मृत्यू

Spread the love

खानापूर : नागुर्डा ता. खानापूर येथील मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे जवान संतोष नामदेव कोलेकर यांचा पुणे येथील रेजिमेंटच्या इस्पितळात रविवार दि.१९ रोजी दुपारी ३ आकस्मिक मृत्यू झाला.

कै. नामदेव कृष्णा कोलेकर गुरुजी (मूळचे कौंदल गावाचे) हे संतोष यांचे वडील. संतोष यांचे प्राथमिक शिक्षण नागुर्डा येथील मराठी शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण मराठा मंडळ कानसुली हायस्कुल येथे झाले. दि.२५ एप्रिल २००३ रोजी ते बेळगावच्या १७ मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट मध्ये ते भरती झाले होते. आपल्या १८ वर्षाच्या सेवेत त्यांनी जम्मू -काश्मीर, लेह-लडाख, आसाम-नागालँड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नेपाळ, बंगाल, राजस्थान, गुजराथ आदी ठिकाणी देशसेवा बजावली. सेवेत असताना रविवार दि. १९ रोजी दुपारी ३च्या सुमारास त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला.

संतोष यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. सोमवार दि. २० रोजी दुपारी नागुर्डा येथे रेजिमेंटच्या इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *