
बेळगाव : बेळगाव शिक्षण संस्थेच्या श्रीमती उषाताई गोगटे कन्या विद्यालयात सन 2022-23 वर्षासाठी इंट्रॅक्ट क्लबची पुनर्रचना शनिवार 23 जुलै रोजी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लबचे पूर्व अध्यक्ष ऍड. सचिन बीचू उपस्थित राहून इंट्रॅक्ट क्लब च्या पदाधिकाऱ्यांना ब्याच वितरण करुन अधिकार प्रदान करून विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. इंट्रॅक्ट क्लब मध्ये सहभागी झाल्यास नेतृत्वाचे धडे व समाजोपयोगी कार्य करण्यास प्रेरणा मिळते. भविष्य घडविणे हे आपल्या हातात असते त्यामुळे एखाद्या क्षेत्रात श्रेष्ठ होण्याचे स्वप्न पाहून ते पूर्ण करण्यास प्रयत्न करण्याचा सल्ला दिला विद्याभासाबरोबर जीवनोपयोगी गोष्टी शिकून समाजोपयोगी उपक्रम राबविले पाहिजे असा सल्ला दिला. अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे भावी अध्यक्ष जगदीश सिध्दन्नवर होते. क्लबच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या अनेक प्रोजेक्ट्सबद्दल महिती दिली. रोटरी क्लबचे पदाधिकारी अक्षय कुलकर्णी, मनीषा हेरेकर, श्रीनिवास देशपांडे उपस्थित होते. मुख्याध्यपक एम. के. मादार, क्लब इन्चार्ज शिक्षक वाय. एच. कांबळे, शिक्षक व विद्यार्थीनी उपस्थित होते. वनिता मुनवल्ली हिने सूत्र संचालन केले.
सन 2022-23 वर्षाचे इंट्रॅक्ट क्लब चे पदाधिकारी – अध्यक्ष – वर्षा कोरिमठ, भावी अध्यक्ष- वैभवी जोशी, उपाध्यक्ष – प्रतीक्षा पाटील, सचिव- श्राव्या शेट्टी, सह सचिव – बूमी बडीगेर, खजिनदार- मधू हशिलकर, डायरेक्टर – दिव्या पिशेन्नवर, श्वेता कुंदरणाड, श्रीरक्षा इटगीकर, सिंचन कोपर्डे, रक्षिता मुळे व भूमिका मकाटे यांची निवड झाली.
Belgaum Varta Belgaum Varta