बेळगाव : कर्नाटकातील प्रसिध्द लेखक डॉ. जी. बी. हरिश यांनी ‘यल्लरिगु बेकाद अंबेडकर…गोत्तेइरद अवेष्टो संगतीगळु’ हे कन्नड पुस्तक लिहिले आहे. याचा मराठी अनुवाद बेळगावातील ख्यात साहित्यिक व अनुवादक श्री. अशोक बाबुराव भंडारी यांनी केला आहे. याचे नाव ‘सर्वांना हवेसे असणारे अंबेडकर…माहीतच नसलेल्या अनेक गोष्टी’ या पुस्तकाचा प्रकाशन कार्यक्रम साध्या पध्दतीने भंडारी यांच्या निवासस्थानी दि. 27 रोजी करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ स्वयंसेवक रामनाथ नायक, गजानन पावले, विभाग शारीरिक प्रमुख तुषार बाळेकुंद्री, जिल्हा व्यवस्थाप्रमुख विशाल खंडागळे, संपर्क प्रमुख देविप्रसाद कुलकर्णी, डॉ. अरुण होसमठ, महादेव धरिगौडर, रामचंद्र एडके उपस्थिंत होते. तसेच भंडारी यांचा पुतण्या दत्ता व त्यांची पत्नी सौ. सुप्रिया हजर होते.
हे पुस्तक 112 पानी आहे. बेंगळूर येथील वंदेमातरम संस्थेने याचे प्रकाशन केले आहे. पुस्तकाचे मूल्य रु. 175 आहे. पुस्तक सा. ‘वीरवाणी’च्या गोंधळी गल्लीतील कार्यालयात उपलब्ध आहे. संपर्कासाठी मो. क्र. 9480343329.