
बंगळूर : १५ जुलै २०२१ हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. या जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने कर्नाटक सरकार, सिडोक (CEDOK) यांच्या सहयोगाने कर्नाटकातील यशस्वी युवा उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
बेलगाव येथील पेपर पैकेजिंग बॉक्स तयार करण्यात गुंतलेल्या स्टार्टअप बेलकोर इंडस्ट्रीजला कर्नाटकातील 60 इतर स्टार्टअपमध्ये नामांकन देण्यात आले होते.
या कार्यक्रमात बेळगावचे युवा उद्योजक श्रीकांत माने, गजानन हसबे, प्रसाद पाटील व अक्षय पाटील यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. बी. एस. येडियुराप्पा यांच्यासह कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण सी. एन. यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.