खानापूर (प्रतिनिधी) – खानापूर तालुक्यातील रामापूर व सुरापूर भागात कृषी खात्याकडून मक्का, भात व ऊस पिकाची पाहणी करून त्यावर पडलेल्या रोगाची तसेच किडीचा प्रादुर्भाव आदीवर मार्गदर्शन केले.
यावेळी मक्का पिकावर लद्देहुळवीन किड हा रोग पडला असुन त्याच्यावर ईमा मेक्सीनबेझोयेट औषध लीटर मिश्रणातून एक एकर जमिनीला दीड लिटर वापरावे.
भात पिकावर बंकी रोग हा पडला आहे. या रोगासाठी कार्बनडाय झोम औषधीचे मिश्रण करून दिड लिटरमध्ये एक एकर जमिनीत वापरणे,
ऊस या पिकावर तुक्की रोग पडल्यास हेजक्कीनेझील एक लीटर मिश्रणातून दीड एकर जमिनीवर मारणे याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी खानापूर सहाय्यक कृषी निर्देशक डी. बी. चव्हाण यांनी शेतकरी वर्गाला सुचाना केल्या. कार्यक्रमाला रामापूर, सुरापूर गावचे शेतकरी उपस्थित होते.
