बेळगाव : एसकेई सोसायटीचा संस्थापक दिन कार्यक्रम शनिवार दि. ६ रोजी होणार आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे माननीय कुलगुरू, प्रा.डी.टी. शिर्के हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. श्री. खेमराज सावंत भोसले (राजमाता राणी पार्वतीदेवी यांचे नातू) हे विशेष पाहुणे असतील.
एसकेई सोसायटीचे बेळगावचे चेअरमन किरण ठाकूर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. आरपीडी महाविद्यालयात के.एम. गिरी सभागृहात सकाळी 10.30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमास एसकेई सोसायटी व्यवस्थापन मंडळ सदस्य, एसकेई सोसायटीच्या विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, शिक्षक व कर्मचारी सहभागी होणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta