आमदार अनिल बेनके यांची अध्यक्ष एम. जी. मुळे यांना विनंती
बेळगाव : कर्नाटक मराठा विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. जी. मुळे यांना त्यांच्या कार्यालयात बेंगळुर येथे भेट देवुन उत्तर कर्नाटक आणि बेळगांव जिल्ह्यात मराठा समाजाची संख्या मोठी असल्याने लवकरात लवकर मराठा विकास प्राधिकरणाचे कार्यालय बेळगावातही सुरु करावे, अशी विनंती केली.
यावेळी अधिकार्यांनी सरकारशी चर्चा करुन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. नंतर, कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळाने मराठा समाजातील लोकांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून सक्षम बनविण्याच्या उद्देशाने कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळाककडून 50,000 ते 2,00,000 रुपये पर्यंतचे कर्ज 4/- टक्के व्याजदराने उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने मराठा समाजाला नियमित केले. मराठा समाजातील 18 ते 25 वर्षे वयोगटातील युवक-युवतींना त्यांच्या कौशल्यांचा विकास करण्यासाठी आणि त्यांना स्वातंत्र अमृत महोत्सव मुन्नाडे योजनेअंतर्गत रोजगाराभिमुख बनविण्यासाठी अनुदान दिले जात आहे. आय.टी.आय.एस., जी.टी.टी.एस., के.जी.टी.टी.आय इत्यादी सरकारी संस्थांच्यावतीने अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाद्वारे कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी स्किल कर्नाटक मार्फत अर्ज मागविण्यात येत असून त्याचा मराठा समाजातील जनतेने लाभ घ्यावा.
Belgaum Varta Belgaum Varta