बेळगाव : येळ्ळूर येथील सामाजिक सेवाभावी संस्था नवहिंद क्रीडा केंद्रांच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घरोघरी तिरंगा या शासनाच्या अभियानांतर्गत नवहिंद भवन येळ्ळूर येथे तिरंगा ध्वज नवहिंद मल्टीपर्पज सोसायटीचे चेअरमन श्री. डी. एन. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रारंभी बाळू दणकारे यांनी परेड मार्च घेतला. यावेळी नवहिंद सोसायटीचे चेअरमन श्री. उदय जाधव, संचालक प्रदीप मुरकुटे, प्रकाश अष्टेकर, सी. बी. पाटील, दत्ता उघाडे, आनंद मजुकर, पी. एन कंग्राळकर, एन. एफ. बस्तवाडकर, नितीन कुगजी, वाय. सी. गोरल, वाय. एन. पाटील, दिनेश पाटील, पी. ए. पाटील, संतोष अष्टेकर, सुरेश पाटील, नारायण कुंडेंकर, श्रीधर धामणेकर, प्रमोद जाधव, महेश जाधव, अनिल पाटील, चांगदेव कुरंगी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी तिरंगा झेंडा आणि स्वातंत्र्य सेनानींचा जयघोष करण्यात आला. सामुहिक राष्ट्रगीत म्हणून तिरंगा झेंड्याला मानवंदना देण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta