बेळगाव : बेळगावातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील कॅम्प परिसरातील एका शाळेच्या आवारात अनेक दशकांपासून डौलदारपणे उभा असलेला मोठा वृक्ष उन्मळून पडल्याची घटना शनिवारी घडली.
कॅम्प परिसरातील एका शाळेच्या आवारात गेली दशके जुने झाड डौलाने उभे होते. मात्र हल्ली ते शिथिल होऊन पडण्याच्या अवस्थेत होते. त्यामुळे येथील नागरिकांनी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे हे झाड तोडण्याची अनेकवेळा विनंती केली. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर आज शनिवारी हे झाड पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी न होता मुले सुखरूप शाळेतून घरी परतली.
बेळगावच्या कॅम्प परिसरात अनेक जुनी झाडे असून, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचार्यांनी ती शोधून तोडावीत आणि संभाव्य दुर्घटना टाळावी, अशी मागणी कॅम्पमधील रहिवाशांनी केली आहे.