बेळगाव : जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक प्राप्त खानापूर तालुक्यातील शिक्षकांचा खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे खानापूर शिवस्मारक येथे उद्या शनिवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी ठीक चार वाजता सत्कार आयोजित करण्यात आला आहे, नंदगड येथील आनंदगड महाविद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नारायण मल्लाप्पा देसाई गणेबैल प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. सदानंद पाटील ढेकोळी प्राथमिक मराठी शाळेचे सहशिक्षक श्री. नारायण करंबळकर यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरल्याबद्दल खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने शनिवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी ठीक चार वाजता शिव स्मारक खानापूर येथे सत्कार केला जाणार आहे खानापूर तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे ज्येष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे तरी तालुक्यातील आजी माजी लोकप्रतिनिधी व मराठीप्रेमी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आयोजकांतर्फे कळविण्यात आले आहे.
