उचगाव : उचगाव येथील अमरज्योत शिक्षण सेवा मंडळ संचलित मळेकरणी हायस्कूलमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना, कोविड-19 विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी शुक्रवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी करण्यात आली.
सध्या या परिसरात विद्यार्थ्यांना ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी अशा प्रकारचा वायरस असल्याने विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून शिक्षण खात्याने व शासनाने दिलेल्या सूचनेनुसार हायस्कूलमधील इयत्ता आठवी, नववी आणि दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांच्या कोरोना तपासणी चाचणीची सुरुवात करण्यात आली आहे. सर्वत्र कोरोना चा पादुर्भाव वाढत असल्याने विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शासन या सर्वांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे, सध्या शाळांना नियमित प्रारंभ झाला आहे.
शाळेमधून विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली आहे, मात्र अशा वेळी या व्हायरसमुळे विद्यार्थी पालकांच्यामध्ये भीतीचे वातावरण असल्याने पुढे कोरोना सारख्या संसर्गजन्य रोगाची लागण होऊ नये यासाठी म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने मळेकरणी हायस्कूल आणि उचगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने मुलांची कोरोना तपासणी करण्यात आली.
यावेळी उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला वैद्याआधिकारी डॉक्टर स्मिता गोडसे, सुनील बोंगाळे तसेच अशा कार्यकर्त्या उपस्थित राहून विद्यार्थ्यांची तपासणी केली.
यावेळी मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले शिक्षक व्ही. एम. देसाई, शिक्षिका प्रतीक्षा भट, प्रवीणा देसाई, शितल कंग्राळकर -जाधव, राजेश्वरी सनदी, जी. के. तुप्पट, एस. एच. चौगुले यांच्या नेतृत्वाखाली ही तपासणी पूर्ण करण्यात आली.
