बेळगाव : आगामी गणेशोत्सवानिमित्त गुरुवार दि. 18 ऑगस्ट 2022 रोजी बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी बेंगळूर येथे माननीय उर्जामंत्री श्री. सुनील कुमार यांची भेट घेतली.
यावेळी बेळगांवातील सुप्रसिद्ध गणेशोत्सवाच्या दिवसात सार्वजनिक गणेश मंडपांना वीज पुरवठा करताना कोणतीही अनामत रक्कम घेऊ नये, असे निवेदन सादर केले. जुन्या ठेवीचे पैसे सोडावेत आणि एक्य असल्यास बिलात सवलत द्यावी, अशी विनंती करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta