Sunday , May 26 2024
Breaking News

उपाध्याय यांच्या विचारांचे अनुकरण करणे गरजेचे : किरण जाधव

Spread the love

टिळक चौकात पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्मदिन साजरा
बेळगाव : पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात आला. लोकमान्य टिळक चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रभाग क्रमांक 4 चे नूतन नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, भाजप ओबीसी राज्य युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण जाधव, महानगरसह प्रभारी रमेश देशपांडे वकील यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मानवतावादी दृष्टीने समाजाकडे पहा. संघटित समाज देशहितासाठी पूरक ठरू शकतो. यासाठी संघटित होऊन प्रगती साधा असे नेहमीच दीनदयाल उपाध्याय म्हणायचे. त्यांच्या या उद्दात विचाराचे अनुकरण करून एक आदर्श समाज निर्माण केल्यास दीनदयाल उपाध्याय यांचा जन्मदिनी साजरा करणे सार्थ ठरणार असल्याचे किरण जाधव यावेळी बोलताना म्हणाले.
अन्य मान्यवरांची यावेळी समयोचित भाषणे झाली.
याप्रसंगी विक्रम राजपुरोहित, किरण कलकुप्पी, शितल चिक्कन्नवर, पाटील वकील, राघवेंद्र कट्टी, अनिल मुतगेकर यासह भाजपचे अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच लोकमान्य रिक्षा स्थानकावरील रिक्षाचालक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

तरुणीच्या घरावर दगडफेक करणाऱ्या तरूणाला अटक

Spread the love  बेळगाव : प्रेमप्रकरणातून किणये येथील तरुणीच्या घरावर दगडफेक करणाऱ्या तरुणाला बेळगाव ग्रामीण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *