Wednesday , May 29 2024
Breaking News

भाजप ग्रामीण मंडळाच्यावतीने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा कार्यक्रम

Spread the love

बेळगाव : 17 ऑक्टोबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते 2 ऑक्टोंबर महात्मा गांधीजींचा वाढदिवसा पर्यंत 20 दिवस सेवाही समर्पण या अभियानाला सुरुवात करण्यात आलेले आहे.
बेळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रांमध्ये गेले दोन दिवस तालुक्यातील भागामध्ये बेळगाव ग्रामीणच्या आमदाराबद्दल असमाधान व्यक्त करत अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले होते.
त्या जनतेचा आक्रोश ध्यानात घेऊन भारतीय जनता पार्टी ग्रामीण मंडळच्यावतीने बेळगुंदी परिसरामध्ये रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे बुजविण्यासाठी रोड रोलर तसेच टिप्पर यांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांनी ह्या अभियानांमध्ये भाग घेतला आणि खड्डे बुजविण्यासाठी श्रमदान करण्यात आलेला आहे. रस्त्याची डागडुजी करण्यासाठी आलेल्या वाहनांची पुजा बेळगुंदी ग्रामपंचायतीचे प्रमुख सुभाष हादगल, नाना कागराळकर, सूर्यकांत चौगुले, रामचंद्र मन्नोळकर, देवाप्पा शिंदे, पृथ्वीसिंग व भाजपा बेळगाव ग्रामीण अध्यक्ष धनंजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.
याप्रसंगी विचार व्यक्त करताना भाजप एसी मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य पृथ्वीसिंग म्हणाले, ग्रामीणच्या आमदार ग्रामीणमधील रस्त्यांसाठी 1200 कोटी रुपये खर्च करत आहोत. असे खोटे सांगत आहे. जर 1200 कोटी रुपये खर्च करत असतील तर ग्रामीण भागामध्ये सगळे रस्ते काँक्रिटचे झाले असते. रस्त्याची दुरवस्था आणि विकासाला खीळ बसली आहे. त्याला कारण साड्या आणि कुकर घेऊन घातलेली मतं त्याचा परिणाम आहे. आपण आपली मतं विकल्यामुळे ग्रामीणचे आमदारांना जाब विचारायचा हक्क गमावून बसलो आहोत. यापुढे असे होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे ते म्हणाले.
यावेळी रामचंद्र मन्नोळकर, माजी आमदार मनोहर कडोलकर, जनरल सेक्रेटरी पंकज घाडी, महाशक्ती एक केंद्रप्रमुख परशराम शिंदे, बाळू लोहार, लोखंडे गुणवंत सुतार, संतोष जळगावकर, यल्लाप्पा पाटील, संदीप बोरसे, के. डी. पाटील, परशराम झंगुरूचे, रावळू पाटील, शिवाजी मुतगेकर, चांगदेव पाटील, लक्ष्मण पाटील, राहुल बेळगावकर, दयानंद बोगन उपस्थित होते.
कार्यक्रमामध्ये बेळगुंदी ग्रामस्थ बोकमुर, सोनोली, राकस्कोप, बेळवट्टी, बाकनूर आदी भागातील कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदेशीरपणे देणग्या (डोनेशन) स्वीकारल्यास शाळांची नोंदणी रद्द : जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचा इशारा

Spread the love  बेळगाव : जिल्ह्यातील विनाअनुदानित किंवा अनुदानित शाळांमध्ये मुलांच्या प्रवेशासाठी कोणत्याही प्रकारची देणगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *