
बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येणार्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी बसची सेवा सुरळीत करण्यात यावी, या मागणीचे निवेदन युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मृणाल हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली केएसआरटीसी विभागीय नियंत्रण अधिकार्यांना देण्यात आले.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांत एकही सण साजरे होऊ शकले नाहीत. यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक बेळगाव शहरात आणि शहरातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात ये-जा करतात पण बसची योग्य सुविधा नसल्याने अडचण निर्माण होते. याची तात्काळ दखल केएसआरटीसीने घ्यावी, असे मृणाल हेब्बाळकर निवेदन देतेवेळी म्हणाले.
केएसआरटीसी विभागीय नियंत्रण अधिकारी टी. वाय. नाईक यांनी सर्वतोपरी प्रयत्न करुन मागणीची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी युवा काँग्रेसचे मंजुनाथ तुक्कार, अॅड. हर्षवर्धन पाटील, अजित कदम, शरद पाटील, महांतेश परिश्वाडी, सचिन किल्लेकर, हालप्पा पुजारी, मुरुसिद्ध प्रेम कोलकार, संगप्पा कुडची यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta