Friday , March 6 2026
Breaking News

संतांनी दाखवलेला समाज कल्याणचा मार्ग आचरणात आणावा : किरण जाधव

Spread the love

बेळगाव : श्री नाभिक समाज सुधारणा मंडळ यांच्या वतीने श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला.
श्री संत शिरोमणी सेना महाराजांची पुजा करून कार्यकर्त्यांशी व पदाधिकार्‍यांशी संवाद साधताना मराठा समाजाचे नेते किरण जाधव म्हणाले की, संतांनी दाखवलेला समाज कल्याणचा मार्ग, त्यांचे ज्ञान तसेच स्वतःच्या त्यागाने व आचरणाने घालून दिलेला आदर्श याची खाती जगभर आहे, तो सर्वांनी घ्यावा.
संत सेना रोड येथील श्री संत शिरोमणी सेना महाराज मंदिरात पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमावेळी खासदार मंगला अंगडी, लक्ष्मण पवार तसेच मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मारीहाळ पोलिसांच्या कारवाईत आंतरराज्य वाहन चोरांच्या टोळीचा पर्दाफाश

Spread the love  बेळगाव : मारीहाळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या वाहन चोरीच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *