Wednesday , March 4 2026
Breaking News

कावळेवाडीची किरण बुरूड हिचे अभिनंदनीय यश

Spread the love

बेळगाव : कावळेवाडी (ता. बेळगाव) येथील कुमारी-किरण य. बुरूड हिने नुकताच कडोली येथे शालेय महिला कुस्ती स्पर्धेत 48 वजन गटात प्रथम क्रमांक पटकावत गावचे व शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.
ती कर्ले माध्यमिक विद्यालयात इयत्ता 9 वीत शिकत आहे. जिल्हास्तरावर तिची निवड झाली आहे.
तिला भविष्यात चांगले प्रशिक्षण मिळाल्यास एक उत्तम कुस्तीपटू होईल अशी अपेक्षा तिच्या जिद्द व सरावातून दिसते.
गावातील वाचनालयाचे पदाधिकारी व शाळेचे क्रीडाशिक्षक प्रकाश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हे घवघवीत यश संपादन केले आहे. या तिच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *