Wednesday , March 4 2026
Breaking News

स्वकुळ साळी समाज राज्यस्तरीय महोत्सवात बेळगावच्या श्रेया सव्वाशेरीचा गौरव

Spread the love

 

बेळगाव : स्वकुळ साळी समाज (विणकर) कर्नाटक राज्य पातळीय स्वकूळ साळी सांस्कृतिक महोत्सव बेंगलोर येथे दि. 26 रोजी रवींद्र कलाक्षेत्र येथे संपन्न झाले.
समाजातील राज्यभरातून विविध क्षेत्रांतील पंचवीस साधकांचे गौरव या ठिकाणी करण्यात आले. नृत्य, अभिनय, गायन, पोवाडा गायन, कीर्तनाच्या माध्यमातून मतदान जागृती, समाजसेवा, विविध क्षेत्रांमध्ये नवलौकिक मिळविलेल्या आपल्या बेळगावातून कु. श्रेया विश्वनाथ सव्वाशेरी हिची एकमेव निवड करण्यात आले .
श्रेयाला शॉल, मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
या समयी आयोजक चंद्रबानु शिंदे, कार्यक्रमाध्यक्ष राज प्रभू धोत्रे, माजी आमदार लक्ष्मीनारायण, महाराष्ट्र मंत्रालयातील सेक्शन ऑफिसर विजय वक्ते, सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. श्रेयाने यापूर्वी विविध स्पर्धेमध्ये 150 हून अधिक बक्षिसे मिळविले आहे.

About Belgaum Varta

Check Also

तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने कवी संमेलन उत्साहात

Spread the love  बेळगाव : मराठी भाषा दिनानिमित्त तारांगण व गुरुवर्य नागप्‍पा मिसाळे प्रतिष्ठानच्या वतीने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *