बेळगाव : भाषिक अल्पसंख्यांक कायद्यानुसार बेळवट्टी ग्रामपंचायतमध्ये कन्नड बरोबर मराठी कागदपत्रे मिळावीत, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात ग्रामपंचायत विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आवाहनानुसार तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत निवेदन देण्याची मोहीम राबवण्यात आली आहे. त्यानुसार बेळवट्टी येथेही निवेदन देण्यात आले.
युवा आघाडी अध्यक्ष संतोष मंडलिक, बेळवट्टी ग्रामपंचायत अध्यक्ष माळू मजुकर यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य एन. के. नलवडे, आंबेवाडी ग्रामपंचायत अध्यक्ष चेतन पाटील, बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत सदस्य मोहन गरग, बाबाजी देसुरकर व बेळवट्टी ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta