बेळगाव : कॉलेज रोडवरील प्रथितयश संस्था विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑपरेटिव्ह सोसायटीची अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली. बुधवार दि. 24 रोजी लोकमान्य रंगमंदिरमध्ये ही सभा झाली.
सोसायटीचे अध्यक्ष कुमार पाटील यांनी सोसायटीच्या कामगिरीचा आढावा घेतला. ते म्हणाले, की संस्थेला या आर्थिक वर्षात 7 लाख 50 सजार रुपयांचा नफा झाला. खेळते भागभांडवल 16 कोटी 46 रु. इतके आहे. सभासदांना 10 टक्के लाभांश देणार आहे. एकूण सदस्यसंख्या 755 इतकी आहे. ठेवी 15 कोटी 79 लाख रु. इतक्या आहेत.
कुमारी वैष्णवी नाडगौडाने सुंदर प्रार्थना सादर केली. संस्थेच्या संचालिका श्रीमती नीता कुलकर्णी यांनी सुरेख सूत्रसंचालन केले. सेक्रेटरी सौ. सविता गवस यांनी गतवर्षीचा सभावृत्तांत मांडला. व्हाईस चेअरमन प्रा. दत्तात्रय नाडगौडा यांनी संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. संचालक अरविंद कुलकर्णी यांनी नफातोटा पत्रक सादर केले. संकेत कुलकर्णी यांनी अंदाजपत्रकाचे वाचन केले. संचालक रवींद्र जोशी ऑडिट रिपोर्ट सादर केला.
आजादी का अमृत महोत्सवानिमित्त ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठल याळगी, कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचा सत्कार कुमार पाटील आणि दत्तात्रेय नाडगौडा यांनी केला. सेवानिवृत्त सैनिक प्रकाश घोडके यांचा सपत्निक सत्कार सौ. पूजा पटील व अविनाश कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. नुकत्याच झालेल्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणार्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे कौतुक करण्यात आले. विशेष ठेवीदार आणि नियमितपणे कर्जफेड करणार्या सदस्यांचेही कौतुक करण्यात आले.
ठेवीदारांपैकी किशोर काकडे, श्याम देशपांडे, गोरे, सुहास गुर्जर, अनिरुद्ध हुन्नरगीकर आदींनी सोसायटीच्या कार्याचे कौतुक केले. बैठकीला सदस्य, ठेवीदार, हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta