Saturday , March 7 2026
Breaking News

गणेशमूर्ती मिरवणूक मार्ग व विसर्जन तलावाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली दुचाकीवरून पाहणी!

Spread the love

 

बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज बेळगावात चक्क दुचाकीवरून फिरून गणेशमूर्ती मिरवणूक मार्ग व विसर्जन तलावाची पाहणी केली.

गणेशोत्सवानिमित्त मिरवणूक निघणाऱ्या शहरातील प्रमुख रस्त्यांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज सोमवारी चक्क दुचाकीवरून प्रवास केला. गणेशाची प्रतिष्ठापना व विसर्जन करताना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी योग्य ती तयारी करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मिरवणूक मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, रस्त्यावर लोंबकळणाऱ्या उच्चदाबाच्या वीजवाहिन्या तातडीने दुरुस्त कराव्यात, असे त्यांनी महानगर पालिका व हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

गणेश विसर्जन केले जाणाऱ्या कपिलेश्वर तलावाची आणि आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करावी, सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्पुरते कुंपण घालण्याबरोबरच आवश्यक सुरक्षा उपाय योजावेत. याशिवाय संचारी विसर्जन तलावांच्या व्यवस्थेबाबत जनतेला आगाऊ माहिती द्यावी. सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान लाखो लोकांची गर्दी विसर्जनस्थळी होत असल्याने स्वच्छता व सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

गणेशोत्सवानिमित्त रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांनी दिली. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कपिलेश्वर विसर्जन तलाव, खडेबाजार, रामलिंगखिंड गल्ली आदी विविध मार्गांवर दुचाकीवरून फिरून पाहणी केली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, पालिका अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह मनपाच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीला ३० वर्षांची सक्तमजुरी

Spread the love  बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा पोक्सो न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *