


बेळगाव : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हुतात्मा चौक व प्राईड सहेली यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजनानी झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून प्रार्थना म्हणण्यात आले. व्यासपीठावर हुतात्मा चौक मंडळाचे अध्यक्ष अशोक पोतदार, सेक्रेटरी शिवाजी हंडे, प्राईड सहेलीच्या अध्यक्ष आरती शहा, उपाध्यक्ष स्नेहल शहा राम जोशी होते.
पाहुण्यांचे स्वागत आरती शहा यांनी केले. प्रास्ताविक शिवाजी हंडे यांनी केले. अशोक पोतदार यांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पाककला स्पर्धेचे परीक्षक सौ. सुधा माणगांवकर व ज्योती पाटील, आरती ताट सजवणे व क्ले पासून गणपती तयार करणे यासाठीच परीक्षक रितूल मुरकुटे व भाषण स्पर्धेचे परीक्षक सीमा सोलापूर व मंजुषा पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
सीमा सोलापूर, मंजुषा पाटील या शिक्षिका असल्याने व शिक्षक दिन असल्याने या दोन्ही शिक्षिका तसेच व्ही. जी. कुलकर्णी या तीन शिक्षकांचा शाल व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
त्यानंतर सर्व स्पर्धा सुरू झाल्या व त्या यशस्वीरित्या पार पडल्या. विजेत्या स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ ८ सप्टेंबरला हुतात्मा चौक मंडळात होणार आहे. सर्व विजेत्यांना
फोन करून सूचित करण्यात येईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली शहा यांनी तर आभार प्रदर्शन स्नेहल शहा यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहेलीच्या सर्व सदस्या, हुतात्मा चौक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदत केली.
Belgaum Varta Belgaum Varta