बेळगाव : सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा बेळवट्टी ता. जि. बेळगाव शाळेतील कन्नड शिक्षक ए. पी. बेटगेरी यांना यंदाचा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून बेटगेरी यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त बेळवट्टी शाळेची एसडीएमसी कमिटी, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्यामार्फत आदर्श शिक्षक बेटगिरी यांचा सत्कार समारंभ पार पडला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, एसडीएमसी अध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य मधू नलावडे व एसडीएमसी अध्यक्ष श्री. गजानन देसाई यांच्या उपस्थितीत हा सत्कार समारंभ संपन्न झाला.
Belgaum Varta Belgaum Varta