
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन ’पशुसंगोपन-वैद्यकीय विभाग’ बेळगांव यांच्या सहाय्यक संघसमुहाकडून आज दि. 17 सप्टेंबर रोजी गोजगे येथे ’लम्पी-स्किन डिसीज’ या गाई, म्हशी आणि बैलांमध्ये होणार्या रोगाचा प्रसार आणि प्रादुर्भाव विचारात घेऊन पूर्वखबरदारीखातर लसीकरण शिबीर राबविण्यात आले.
यावेळी सरकारी दवाखाना आंबेवाडी-गोजगा-मण्णूर येथील डॉ. प्रदीप हन्नूरकर, डॉ. ज्योतिकुमार नावेकर, डॉ.शिवाजी चौगुले तसेच म. ए. समितीचे आंबेवाडी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष चेतन पाटील, कांतेश चलवेटकर, शंकर लोहार, खंडोबा येळगे, रामा नाईक, यल्लाप्पा होनगेकर, युवराज प्रभाकर, मारूती नाईक, अविनाश चौगुले, मारुती जाधव, प्रमोद करटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta