बेळगाव – राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयतर्फे गांधीजयंती निमित्त रविवारी दोन ऑक्टोबर रोजी कला, ज्ञान, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंताचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजयराव नंदिहळी उपस्थित राहणार आहेत.
महात्मा गांधी प्रतिमा पूजन मोहन मोरे, लालबहादूर शास्त्री फोटो पूजन मनोहर बेळगावकर यांच्याहस्ते होणार आहे
प्रमुख उपस्थिती नागेश अ. मनोळकर, एन. के. नलावडे, पोमाणा कुन्नूरकर, वसंत अष्टेकर, अरुण कणबरकर, सागर बाचीकर आदी मान्यवर आहेत.
यावेळी गावातील उदयोन्मुख कुस्तीपटू रवळनाथ कणबरकर, महिला कुस्तीगिर किरण य.बुरूड, बेळगावचा धावपटू तुषार भेकणे राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक विजेता, तेजस्वीनी कांबळे एम.ए. मराठीत राणीचन्नमा विद्यापीठात सुवर्णपदक संपादन, क्रीडाशिक्षक प्रकाश शेळके, सिद्धेश्वर तुर्केवाडकर तसेच यावेळी गांधीजयंतीचे औचित्यसाधून
ग्रामीण भागातील पत्रकार अण्णापा पाटील, प्रल्हाद चिरमुरकर, जोतिबा मुरकुटे यांचाही सन्मान केला जाणार आहे. गेली सलग चारवर्षे विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षक, पत्रकार, खेळाडू, साहित्यिकांना बोलावून त्यांचे विचार ऐकून घेणे, विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करणे, त्यांना भविष्यात अधिक कार्य करण्यासाठी प्रेरणा प्रोत्साहन मिळावे, कौतुकाची थाप मिळावी याच एका उदात्त हेतूने हे विधायक उपक्रम घेतले जातात.
कुस्ती कुठतरी लोप पावते आहे का, असे वाटत असतानाच नवी आशेची पालवी या कुस्तीपटूनी, नवा किरण पल्लवीत केला आहे, मुलं, मुली खेळाकडे आपलं करिअर म्हणून बघत आहे. ही जमेचीबाजू आहे.
गावातील इतर युवकयुवतीनी खेळाकडे लक्ष केंद्रित करून नावलौकिक वाढवावा हाच शुद्धहेतू ठेवून संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्वानी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष वाय. पी. नाईक,मनोहर प.मोरे, सूरज कणबरकर यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta