
बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतच्या वतीने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त अवचारहट्टी रोड हरिमंदिर समोर बऱ्याच दिवसापासून कचऱ्याचा ढिगारा होता. याची दखल घेऊन येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी तातडीने त्याठिकाणी स्वच्छता अभियान केले व तो परिसर स्वच्छ करून दिला. यावेळी येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदूरकर, परशराम परीट, रमेश मेनसे, दयानंद उघाडे, राकेश परीट, जोतिबा चौगुले, पीडिओ अरुण नाईक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta