बेळगाव (प्रतिनिधी) : पूर्ववैमनस्यातून झालेल्या हाणामारीत धोका युवकांचा निर्घृण खून झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावात गुरुवारी रात्री घडली असून याप्रकरणी मारिहाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. सुळेभावी येतील रणधिर महेश अलियास रामचंद्र मुरारी (वय २६), प्रकाश निगप्पा हुंकार पाटील (वय २४) या दोघा युवकांचा निर्घृण खून करण्यात आला आहे.
सदर घटना येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गुरुवारी रात्री घडली असून घटनास्थळी मारिहाळ पोलीस स्थानकाचे पोलीस फौजदार बस्तापुरे, डीसीपी रवींद्र गडादि दाखल झाले असून पुढील तपास सुरू ठेवला आहे.
Belgaum Varta Belgaum Varta