बेळगाव : येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृह विज्ञान महाविद्यालयात नवीन वर्षात प्रवेश घेतलेल्या बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्यासाठी स्वागत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जी. वाय. बेन्नाळकर हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात बी.कॉम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवनाने झाली. तद नंतर कार्यक्रमाचे संयोजक, हिंदी विभाग अध्यक्ष डॉ. डी. एम. मुल्ला यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या कार्यक्रमामध्ये शिक्षक वृंद यांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यात आला. तसेच महाविद्यालयांमध्ये आयोजित होणाऱ्या अनेक कार्यक्रमांची माहिती ग्रंथपाल सुरेखा कामुले, नँक संयोजक प्रा. आर .एम .तेली, वाणिज्य विभाग अध्यक्ष डॉ.एच.जे. मोळेराखी, शारिरीक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. राजु हट्टी, इतिहास विभाग प्रमुख प्रा. शिल्पा मोदकप्पगोळ यांनी प्रस्तुत केली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य जी.वाय. बेन्नाळकर म्हणाले की, विद्यार्थी आपल्या दैनंदिन जीवनात सतत अध्ययनशील असले पाहिजेत. त्यांची अध्ययनशील वृत्ती त्याना जीवनात नक्की यशाकडे घेऊन जाते. शिस्त आणि अध्ययनशीलता त्यांना उच्च ध्येय गाठण्यासाठी मदत करते आणि येणाऱ्या समस्या पासून त्याना वाचवू शकते.
कार्यक्रमाचा शेवट डॉ.एच.जे. मोळेराखी यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी .एम. मुल्ला यांनी केले. यावेळी प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होता.