बेळगाव (वार्ता) : माजी आमदार संजय पाटील मराठी माणसांवर पुन्हा एकदा घसरले आणि त्याविरोधात काँग्रेस पक्षाने त्यांच्या गोमटेश विद्यापीठाच्या समोर निदर्शने केली.
बेळगाव ग्रामीणच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि त्यांच्यात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या वादात संजय पाटील यांनी मराठी माणसांवर तोंडसुख घेतल्याने संताप वाढला आहे. आज काँग्रेस पक्षाने निदर्शने करून त्यांचा निषेध नोंदवण्यात आला.
राकसकोप क्रॉसनजिक पडलेल्या खड्ड्यासंदर्भात एक बॅनर लावण्यात आला. त्या बॅनरमध्ये लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर टीका करण्यात आली होती. बॅनर लागल्यानंतर लगेच बेळगाव ग्रामीण भाजपतर्फे ते खड्डे बुजवण्यात आले. या संदर्भात माध्यमानी छेडले असता तो बॅनर मात्र आपण लावला नसल्याचे आमदार संजय पाटील यांनी म्हटले.
ते एवढे बोलून थांबले नाहीत तर असले घाणेरडे प्रकार भाजप कधीच करत नाही. रात्रीच्या वेळी बॅनर लावायची कामे मराठी माणसे करतात असे उत्तर त्यांनी माध्यमांना दिल्यामुळे मराठी भाषिकांत संताप वाढला आहे.
Check Also
सायकल फेरीत सामील झालेल्यांवर कडक कारवाई करणार : मंत्री सतीश जारकीहोळी
Spread the love बेळगाव : जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली नसतानाही महाराष्ट्र एकीकरण समितीने १ नोव्हेंबर …