बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला आणि त्यांच्याशी चर्चा केली. 1 नोव्हेंबर 2022 रोजी सीमाभागात म. ए. समितीच्या वतीने काळादिन पाळण्यात येतो या दिवशी होणाऱ्या जाहीर सभेसाठी महाराष्ट्र सरकारच्यावतीने प्रतिनिधी पाठवून द्यावा, अशी विनंती केली. याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयातील दावा लवकरात लवकर सुरु होण्यासाठी आवश्यक ते सारे लवकर करावे. उच्चाधिकार समितीची आणि तज्ज्ञ समितीची बैठक बोलावून सविस्तर चर्चा करावी. मुंबईतील सीमा कक्ष वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक ताबडतोब करण्यात यावी. महाराष्ट्राचे दिल्लीतील वकील श्री. शिवाजीराव जाधव यांनी ज्येष्ठ वकील नेमणूकीसंदर्भात पाठविलेल्या पत्राची दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी, अशीही विनंती श्री. प्रकाश मरगाळे यांनी केली.
यासंदर्भात त्वरित कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिले.
Belgaum Varta Belgaum Varta