बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी शिवसेना नेते राज्यसभा खासदार सामनाचे संपादक श्री संजय राऊत यांची मुंबई येथील सामना कार्यालयात भेट घेतली.
युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी सीमाप्रश्नी विविध विषयांवर व महानगर पालिका निवडणुकी बाबत चर्चा केली सोबतच सीमाभागातील युवकांच्या व मराठी भाषिकांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांच्याशी चर्चा करून लवकरच बेळगावला भेट देऊन मराठी भाषिकांच्या एकजुटीसाठी समितीच्या सर्व घटकांना एकत्र घेऊन व्यापक कार्यक्रम राबविणार असल्याचे सांगितले.
यावेळी सुरज कणबरकर, संतोष कृष्णाचे, धर्मराज बोराडे आदी उपस्थित होते
Belgaum Varta Belgaum Varta