Sunday , July 26 2026
Breaking News

निपाणीत चोरट्याकडून ९ दुचाकी जप्त

Spread the love

बसवेश्वर चौक पोलिस ठाण्याची कारवाई : ४.११ लाखाची वाहने जप्त
निपाणी : आचारी काम करीत विश्वास संपादन करून दुचाकी चोरी करणाऱ्या चोरट्यास पकडण्यात निपाणी बसवेश्वर चौक पोलिसांना यश आले आहे. पट्टणकुडी येथील अनिल आप्पासाहेब लंगोटे ( वय ३२) यास बसवेश्वर पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून ४ लाख ११ हजार रूपये किंमतीच्या विविध कंपनीच्या ९ दुचाकी जप्त केल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, निपाणी बसस्थानक परिसरात पोलीस गस्त घालत असताना शुक्रवारी (ता.१) सकाळी एक ३२ वर्षीय तरूण दुचाकीवरून संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून चौकशी केली असता. तो संशयास्पद बोलू लागला. त्याला बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यात नेवून पोलीसी खाक्या दाखविताच त्यांने विविध ठिकाणच्या ९ दुचाकी चोरल्याची कबूली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून अंदाजे ४ लाख २५ हजार रूपये किंमतीच्या ९ दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकी निपाणी बसवेश्वर चौक पोलीस ठाणे परिसरातून एक, उगार खुर्द येथून एक तर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून ७ दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आनंद कॅरकट्टी, हवालदार शेखर असोदे, जी. पी. बडीगेर, एम. एस. तेरदाळ, आर. बी. पाटील, प्रकाश सावोजी, श्रीशैल मळगी व सहकाऱ्यांनी यशस्वी तपास करून आरोपीस अटक केली आहे. त्यानुसार बसवेश्वर चौक पोलिसांनी त्यास अटक करून तपास चालविला आहे.

About Belgaum Varta

Check Also

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला करणाऱ्यावर कारवाई करा : बोरगाव येथे निषेध मोर्चा काढून निवेदन

Spread the love  निपाणी (वार्ता) : नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *