रोटरी क्लब वेणूग्राम वतीने आयोजन
बेळगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आज शनिवारी रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव यांच्या वतीने बेळगावातील महावीर भवन येथे महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात 225 जणांनी रक्तदान केले.
इंडियन रेडक्रॉस सोसायटी, वेणूग्राम हॉस्पिटल, एलआयसी, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, इनरव्हील क्लब, रोट्रेक्ट क्लब, बेळगाव सिटी आणि तालुका फोटोग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सदर रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात सहभागी झालेल्या रक्तदात्यांना न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या वतीने एक लाख रुपये विमा पॉलिसी भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली.
शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव अध्यक्ष अरविंद खडबडी, माजी अध्यक्ष डी. बी. पाटील, हेमंत पोरवाल, सेक्रेटरी विनयकुमार बाळीकाई, रेड क्रॉस सोसायटीचे अशोक बदामी, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर सुषमा शेट्टी, वेणूग्राम हॉस्पिटलचे डॉक्टर रमेश देशपांडे, एलआयसीचे अजित वारकरी, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे शशिकांत हलगेकर आदी मान्यवर उपस्थित होते.