Saturday , August 15 2026
Breaking News

कर्नाटक सरकारचा रिपोर्ट खोटा, आघाडी सरकार गप्प का?

Spread the love

संजय राऊतांचा ठाकरे सरकारला संतप्त सवाल

मुंबई : कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांची गळचेपी होत आहे. कर्नाटकमध्ये 15 टक्के मराठी भाषिक असून ते अल्पसंख्याक आहे असं कर्नाटक सरकार म्हणत आहे. सीमाभागात 60 तर 65 टक्के मराठी बांधव आहेत सीमाभागाच कानडीकरण केलं, मराठी टक्का राजकीय स्वार्थासाठी कमी करण्याचे काम आणि कर्नाटक सरकारचा डाव आहे.

राज्य सरकार याबाबत का गप्प आहे हे कळत नाही. राज्य सरकारने दोन मंत्री यासाठी नियुक्त केले आहेत. एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ हे दोन मंत्री समनव्यक आहेत. या दोन्ही मंत्र्यानी तिथे जाऊन या संदर्भात चर्चा करायला पाहिजे. महाराष्ट्र सरकार यावर का गप्प आहे हे कळत नाही. यावर मी मुख्यमंत्री यांच्यासोबत बातचीत करणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

शॉपिंग उत्सवाचा शानदार प्रारंभ

Spread the love  बेळगाव : “गेल्या वीस वर्षे होऊन अधिक काळ सातत्याने नवनवीन उत्पादने बेळगावकरांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *