Monday , December 8 2025
Breaking News

आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते 1.75 कोटी खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन

Spread the love

 

 

बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघांतर्गत येणाऱ्या कुवेंपू नगर येथील आझाद हौसिंग सोसायटी वसाहत व परिसरातील गटारी आणि रस्ते सुधारण्यासाठी बेळगाव महापालिकेकडून 1.75 कोटी रु. प्राप्त झाले आहेत.

आज बुधवारी स्थानिक रहिवाशांच्या उपस्थितीत आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करून सदर कामांचा शुभारंभ करण्यात आला.
आ. लक्ष्मी हेब्बाळकर पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देत असून या भागातील बरीच विकास कामे पूर्ण झाली आहेत.

उद्घाटनानंतर बोलताना आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जनतेच्या मागण्यांचा अग्रक्रमाने विचार करून पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल असे सांगितले.

यावेळी स्थानिक नेते गोपी हेगडे, समीर शिरगुप्पी, निरज हनगल, शिल्पा नाईक, विक्रांत शानभाग, हरीश चोणंद, रोहिणी पाटील, श्वेता शानभाग यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …