Wednesday , March 4 2026
Breaking News

सांबरा येथे काँक्रीट रस्त्यांच्या बांधकामाला चालना

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव तालुक्याच्या सांबरा गावातील गणेश नगरात येणाऱ्या सर्व गल्ल्यांतील रस्त्यांच्या विकासाकरिता आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी 50 रु. लाखांचे अनुदान मंजूर करून काँक्रीटचे रस्ते निर्मितीच्या कामाला चालना दिली आहे. आज आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते सांबऱ्यात सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

यापूर्वी 80 लाख रुपये मंजूर करून रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली होती. आज गावातील उर्वरित रस्ते अद्यावत करून गावातील रस्त्यांच्या विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. एकूण 1.30 कोटी रुपये खर्चून हे रस्ते बांधण्यात येत असल्याचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, संबंधित गल्लीतील रहिवासी नागेश देसाई, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *