Wednesday , March 4 2026
Breaking News

गणेश दूध संकलनातर्फे गावागावांत जनजागृती करणार : उमेश देसाई

Spread the love

 

बेळगाव : सीमाभागात काही संस्थांकडून निर्धारित दर देण्याऐवजी प्रतिलिटर दहा ते पंधरा रुपये कमी दिले जात आहे. प्रत्येक संस्थेला दरपत्रक दिलेले असून देखील ते लावले जात नाही. दरासंदर्भात उत्पादकांना अंधारात ठेवले जात आहे. यासाठी गावागावात जनजागृती करणार असल्याची माहिती गणेश दूध संकलन केंद्राचे प्रमुख उमेश उर्फ प्रवीण देसाई यांनी सांगितले.
बेळगुंदी क्रॉस येथील गणेश दूध संकलन केंद्राच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी देसाई म्हणाले की, शेतकरी गावातील दुध संकलन केंद्रात दूध संकलित करतात. यावेळी संस्था जो दर देईल तो ते स्वीकारतात. लिटर मागे जर 15 रुपये कमी दर दिला गेला तर दर दिवशी पाच लिटर दूध देणार्‍या शेतकर्‍याला प्रतिदिनी 75 रुपये नुकसान होत आहे. काही जागरूक शेतकर्‍यांनी संस्था देत असलेल्या दराची झेरॉक्स प्रत आपल्याकडे दिली त्यामुळे ही बाब लक्षात आली असे त्यांनी सांगितले.
गणेश दूध संकलन केंद्रातर्फे म्हैस दुधासाठी 7.0 फॅटला प्रतिलीटर 52.50 तर गाईच्या दुधाला 4.0 फॅटला 37 रुपये दर दिला जातो. केंद्राकडून दिलेले दरपत्रक शेतकर्‍यांपासून दूर ठेवले जाते.
गणेश दूध संकलन केंद्र जो बोनस देते तो बोनस उत्पादकांपर्यंत पोचत नाही. वजन काट्यातही दोष आहे. उत्पादकांनी आपल्या दुधाचे फॅट दुसर्‍या लॅबमध्ये तपासून बघणे गरजेचे आहे. काही संस्था तोट्यात असल्याचे सांगतात मात्र नोंद वही दाखविण्यास टाळाटाळ करतात. यापुढे आपण गावागावात जनजागृती करणार आणल्याचे ते म्हणाले. यावेळी संस्थापक मोतीराम देसाई व मॅनेजर सुधाकर करटे उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव जिल्हा न्यायालयात बॉम्बच्या अफवेने खळबळ

Spread the love  बॉम्ब शोध पथकाची तपासणी ; सुरक्षा कडक बेळगाव : बेळगाव येथील जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *