बेळगाव : बालदिनानिमित्त बेंगळुरू येथे आयोजिण्यात आलेल्या ऊर्जा संवर्धनावरील राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवी या गटात कु. विभावरी अनिल बडमंजी या विद्यार्थिनीने प्रथम पारितोषिक पटकाविले आहे.
सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटचे सहसंचालक डॉ. एम. जी. आनंदकुमार यांच्या हस्ते विभावरीला पारितोषिक वितरित करण्यात आले असून आता तिची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील चित्रकला स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विभावरी बडमंजी हि मराठा मंडळ हायस्कुलमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकत असून यापूर्वी तिने शहर, तालुका आणि जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके पटकावली आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta