Friday , March 6 2026
Breaking News

बालदिनानिमित्त ‘एंजल’तर्फे शाळांमध्ये मिठाई -खाऊचे वाटप

Spread the love

 

बेळगाव : शहरातील एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या नेतृत्वाखाली बाल दिनाचे औचित्य साधून शहरातील विविध शाळांमधील मुलांना मिठाई व खाऊचे वाटप करण्यात आले.

एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांनी बेळगाव उत्तर मतदारसंघातील सरकारी कन्नड व मराठी शाळांना मिठाईचे वाटप केले. त्याचप्रमाणे त्यांनी फुलबाग गल्ली येथील शाळा नंबर 7, सरदार स्कूल, फुलबाग गल्लीतील 4 अंगणवाडी, माहेश्वरी अंधशाळा, नंदनवन मक्कळ धाम येथे देखील बाल दिनानिमित्त मुलांना खाऊचे वाटप करून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला. याप्रसंगी एंजल फाउंडेशनच्या मीना बेनके, मिलन पवार, शशिकला जोशी, संजय पाटील यांच्यासह शाळेच्या मुख्याधिका सरला कुलकर्णी, माजी विद्यार्थी पुरुषोत्तम कुलकर्णी, अनिता उप्पार, कीर्ती कुलकर्णी, वर्षाकांता विद्या पुजारी, रेश्मा बर्डे आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *