Thursday , December 11 2025
Breaking News

डिसेंबर ३ व ४ रोजी पहिले आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय जैन सम्मेलन

Spread the love

 

बेळगाव : जैन समाजातील धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या सुहस्ती युवा जैन मिलन बेंगळुरू व जैन मिलन दुबई झोनच्या संयुक्त आश्रयमध्ये 3 व 4 डिसेंबर रोजी दुबई येथे पहिले आंतरराष्ट्रीय जैन संमेलन आयोजित करण्यात आला आहे, असे सुहस्ती जैन मिलनचे अध्यक्ष डॉ. पुट्टास्वामी के. डी. सांगितले.
बेळगावात पत्रकारांशी बोलताना सुहस्ती जैन मिलन संस्थेतर्फे गेल्या सात वर्षांपासून कर्नाटकातील विविध भागात जैन संमेलने आयोजित केली जात असून या संमेलनाच्या माध्यमातून समाजात धार्मिक व सामाजिक चिंतन केले जाते. जेएसएस प्रायव्हेट स्कूल आला सफा दुबई येथे पहिल्यांदाच परदेशात जैन संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या जैन संमेलन भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, दुबई या देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या परिषदेत धार्मिक चर्चा व सामाजिक विकास चिंतन चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
याचप्रसंगी माळ हर्षेंद्र जैन यांनी बोलताना सांगितले की, दि. 3 रोजी सायंकाळी 6 वाजता उद्घाटन समारंभ होणार असून, प्रसिद्ध अभ्यासक, जैन साहित्यिक व संशोधक नाडोज डॉ. हंपा नागराजय्या यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. भारतीय जैन मिलन राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिता सुरेंद्रकुमार, एन. प्रसन्न कुमार, माजी मंत्री अभयचंद्र जैन, उद्योगपती निरंजन जैन जलवल्ली, जैन मिलन झोन-8च्या अध्यक्ष पुष्पराज जैन, वरिष्ठ पोलीस अधिकारी जिनेंद्र खानगावी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जैन मिलन दुबई झोनचे अध्यक्ष संदेश जैन अंगदीबेट्टू, सुहस्ती जैन युवा मिलाचे अध्यक्ष पुट्टास्वामी के. डी., दुबई जैन समाजाचे नेते पी. देवकुमार कांबळी, समाजसेवक हशेंद्र जैन, विमल तालिकोटी, श्वेता जैन हे प्रमुख पाहुणे असतील. नरसिंहराजपूर मठाचे स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक स्वामीजी उपस्थित राहून अर्शिवचन देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
त्या दिवशी पद्मप्रसाद जैन यांनी लिहिलेल्या आणि जयलक्ष्मी अभयकुमार लिखित पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. यासोबतच नेरेंकी पार्श्वनाथ यांची वेबसाइटही सुरू करण्यात येणार आहे. या परिषदेसाठी भारतातून एकूण 278 लोकांनी नोंदणी केली आहे. या परिषदेत परदेशातील 250 आणि दुबईतील स्थानिक असे एकूण 600 लोक सहभागी होणार आहेत.
याच प्रसंगी जिनेंद्र चित्ता यांनी डी. 4 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जैन धर्म प्रश्नमंजुषा, खेळ कार्यक्रम, जैन धर्मासाठी सत्य या विषयावर सल्लामसलत आणि संमेलन पुरस्कार वितरण कार्यक्रमांसह डॉ. स्नेयश्री निर्मला कुमार यांचा संगीतमय कार्यक्रम, जैन मिलन दुबईचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामूहिक गायनाचा कार्यक्रम होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत भारतेश शिक्षण संस्थेचे संचालक विनोद दोड्डन्नवर, वज्रकुमार, विमल तालिकोटी, प्रचार समिती सदस्य कुंतीनाथ कलामणी, अभय अवलक्की, पद्मराज वैजन्नवर, पवनकुमार उप्पीन आदी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

“…या खुर्चीवर अवघडल्यासारखे वाटत आहे”…मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Spread the love  बेळगाव : मुख्यमंत्री पदावरून सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यातील गेल्या काही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *